Breaking News

संपत्ती निर्माणात संयमाचे महत्त्व!

-प्रसाद ल. भावे (9822075888/sharpfinvest@gmail.com)

शेअर बाजारातून संपत्ती निर्माण करणारे अनेक गुंतवणूकदार आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते ती संपत्ती कशी जमवतात, याचा शोध घेतला असता त्यांनी गुंतवणूक करताना संयमाला महत्त्व दिल्याचे लक्षात येते. अशा कोणत्या कंपन्यांनी त्यांना संपत्ती मिळवून दिली आहे? आणि कोणत्या कंपन्यांनी संपत्ती नष्ट केली आहे?

सुप्रसिद्ध कार्डिऑलॉजिस्ट श्री. निळकंठ करंदीकर यांनी एका सेमिनारमध्ये सहज केलेलं एक विधान आठवतंय, ते बोलले होते की, चेपशू ळी ींहश ीळुींह ीशपीश ुळींर्हेीीं ुहळलह ेपश लरप’ीं शपक्षेू ींहश ेींहशी षर्ळींश. पैसे किंवा संपत्ती ही अशी सहावी संवेदना आहे की ज्याच्याआधारे आपण इतर पांच संवेदनांचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे उपभोगू शकतो.

तर, आजच्या लेखात आपण संपत्तीबद्दल पाहूयात. मग संपत्तीची नक्की व्याख्या काय? अगदी दोनच शब्दांत सांगायचे तर ‘पैशाची किंवा मौल्यवान गोष्टींची उदंडता’.  एक लक्षात घेतलं पाहिजे, की बचत, गुंतवणूक व संपत्ती या तीनही संज्ञा या एकमेकांशी फारच निगडित आहेत, परंतु तरी त्यांना स्वतःचा असा वेगळा अर्थ देखील आहे. बचत म्हणजे बाजूला टाकलेली शिल्लक, म्हणजेच आपल्या नेहमीच्या खर्चातून विशिष्ट उद्दिष्टासाठी वाचवून ठेवलेली शिल्लक रक्कम. गुंतवणूक ही त्याच्या पुढची पायरी म्हणजे, शिल्लक किंवा साठवलेली बचतीची रक्कम ही नुसती तशीच न ठेवता त्यात कोणतीही जोखीम न घेता वाढ होण्याच्या उद्देशानं कशात तरी गुंतवणं आणि संपत्ती म्हणजे, अनेक वर्षांनंतर योग्यप्रकारे केलेल्या गुंतवणुकीतून उभी राहिलेली प्रचंड रक्कम ज्यात उत्तम वाढीसाठी जोखीम ही गृहीत धरलेलीच असते.

आता, या अनुषंगानं आपल्या सर्वांनाच परिचित असलेली एक संज्ञा म्हणजे वेल्थ मॅनेजमेंट (संपत्ती व्यवस्थापन); म्हणजे नक्की काय? आता संपत्ती व्यवस्थापन म्हणजे ज्यांच्याकडं वेल्थ म्हणजे संपत्ती आहे तिचं व्यवस्थापन करणं की पुढच्या पिढीसाठी संपत्ती जमवणं/तयार करणं? नक्कीच, असलेल्या संपत्तीचं योग्यप्रकारे व्यवस्थापन करणं असं याचं उत्तर असू शकतं परंतु जर एखाद्यास आपल्या मुलांसाठी किंवा पुढच्या पिढीसाठी संपत्ती जमवायची असेल तर काय? प्रश्न आहे की, खरंच अशाप्रकारे संपत्ती बनवता येऊ शकते का? तर याचं उत्तर आहे, होय.  आपल्यासमोर अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्याद्वारे मागील कांही वर्षांत लोकांची संपत्ती बनली आहे. आता एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे येथे संबोधलेली संपत्ती ही संज्ञा ही योग्य गुंतवणुकीतून तयार झालेली संपत्ती आहे, ना की कोणत्या अचानक धनलाभाद्वारे अथवा लॉटरीद्वारे आलेली संपत्ती.

आता गुंतवणुकीतून संपत्ती बनवणं ही काही सोपी गोष्ट नाही. तर त्यासाठी सर्वांत प्रथम हवा तो तुम्ही योग्य अभ्यासाद्वारे गुंतवणूक करीत असलेल्या साधनावरचा विश्वास की याच अमूक एक साधनाद्वारे माझी गुंतवणूक ही पुढील काही वर्षांत अनेकपट वाढून त्याची संपत्ती बनणार आहे. अनेक लोक सोन्यावर विश्वास दाखवून त्या गुंतवणुकीलाच संपत्ती समजून बसतात, परंतु वर म्हटल्याप्रमाणं गुंतवणूक ही मागील वर्षांत अनेक पटीत वाढलेली असेल, तरच त्यास आपण वेल्थ म्हणू शकतो. खालील तक्त्यात मागील पाच वर्षांमधील (डिसेंबर 2016-2021) संपत्ती बनवणार्‍या कंपन्या दिलेल्या आहेत, ते पाहून आपणच ठरवू शकतो की वेल्थ क्रिएटर कोण आहेत ते.

या उलट, सोन्याचा एक तोळ्याचा भाव हा पाच वर्षांपूर्वी म्हणजे, डिसेंबर 2016 मध्ये 27450 रुपये होता तर त्याच वेळी खालील तक्त्यातील तनलाप्लॅटफॉर्म या कंपनीच्या शेअर्सचा भाव होता रु. 56. आज पाच वर्षानंतर सोन्याचा भाव आहे 47400 रुपये, म्हणजे साधारण पाच वर्षांत 73 टक्के वृद्धी, तर त्याच तनलाप्लॅटफॉर्मच्या शेअर्सचा आज भाव आहे 1900 रुपये, म्हणजे तब्बल 34 पट. (यात मिळालेला लाभांश गृहित धरला नाहीय.) हीच गुंतवणूक निफ्टी 50 निर्देशांकामधील बजाज फायनान्समध्ये केली असती तर ती गुंतवणूक आज आठपट परतावा देऊन गेली असती. अगदी सर्वांच्याच परिचयाचं असलेलं डीमार्ट, त्याच्या कंपनीमध्ये हीच गुंतवणूक केली असती (मार्च 2017-रु. 600) तरी ती गुंतवणूक आज साडेसातपट झाली असती. आता आपणच ठरवूया की वेल्थ क्रिएटर गुंतवणूक कोणती? सोनं की अशा कंपन्या..

या उलट काहीना वाजलेल्या कंपन्यांनी मागील पाच वर्षांत वेल्थ डिस्ट्रॉयरचं काम देखील केलेलं आढळतं. खालील तक्त्यात त्या मांडलेल्या आहेतच. सर्वांच्याच लाडक्या असलेल्या येस बँक आणि आयडियाच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना मागील पाच वर्षांत कंगाल केलं. येस बँकेच्या शेअर्समध्ये केलेल्या गुंतवणुकीत आजच्या भावानं 94% नुकसान आहे म्हणजेच यात 2016 मध्ये 100000 गुंतवलेले असल्यास आज त्याचे केवळ 6 हजारच उरले आहेत. तीच गत आयडियाच्या शेअर धारकांची. तब्बल 82% नुकसान, तेही मागील वर्षातील अभूतपूर्व तेजीनंतर.

आता वेल्थ क्रिएटर व वेल्थ डिस्ट्रॉयर कंपन्या आगाऊ ओळखता येऊ शकतात का? कांही लोकांचं म्हणणं असतं की असे उत्तम शेअर आम्हाला निवडता येत नाही, तर मग अशांसाठी मागील कांही महिन्यांत याच सदरात कांही लेखांमधून मी उत्तम कंपन्या कशा निवडायच्या याबद्दल लिहिलेलंच आहे. त्यांत कांही क्लृप्त्या दिलेल्याच आहेत. अगदी उत्तम शेअर्सची निवड जरी जमत नसेल तरी अगदी ढोबळ मानानं सेन्सेक्स या निर्देशांकात जरी गुंतवणूक केली असती (इंडेक्स ईटीएफ अथवा इंडेक्स फंडद्वारे) तरी त्यात कांही पट वाढ झाली असती. (डिसेंबर 2016मध्ये सेन्सेक्स होता 26626 व आज आहे 57000, म्हणजे जवळ जवळ दुपटीपेक्षा जास्त वाढ, तेही करोनाच्या काळात साडेसोळा हजारांपेक्षा जास्त झालेली पडझड सोसून).

दुसरे एक उदाहरण म्हणजे अनेक लोक स्थावर मालमत्ता म्हणजेच खरी संपत्ती असं समीकरण जुळवतात, परंतु मागील 10 वर्षांत त्यातील गुंतवणूकदारांचं काय झालंय यावर न बोललेलंच बरं.

असो, गुंतवणुकीतून संपत्ती करताना दुसरी महत्त्वाची गोष्ट हवी, ती म्हणजे संयम. साधा दाखला द्यायचा तर नुकत्याच लावलेल्या झाडापासून लगोलग फळांची अपेक्षा ठेवणं मूर्खपणाचं आहे, तरी दुसरीकडं त्याची योग्य प्रकारे निगा राखण्यासाठी त्यामध्ये गुंतवणूक करत राहणं कमप्राप्त आहेच.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply