पनवेल : वार्ताहर
थायलंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेत पनवेलमधील पेसमेकर डान्स अकॅडमीने आपल्या नावावर सोनेरी मोहोर उमटवली आहे. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या पेसमेकरच्या संघाने अकॅडमीच्या स्पर्धकांनी ग्रॅन्ड फिनालेमध्ये मानाची गोल्ड ट्रॉफी पटकावली. त्यांनी हीप-हॉप आणि बॉलीवूड या डान्स स्टाईलचे मिक्चर करून जगातील सर्व सैनिकांना मानाचा मुजरा केला आहे.
या विजेत्या संघाला पेसमेकर डान्स अकॅडमीचे योगेश पाटकर यांनी मार्गदर्शन केले. त्यांना शुभम तांबे आणि सागर चव्हाण यांनी सहाय्य केले. या संघामध्ये देवीकृष्णा जयशंकर, अवनी पवार, मिहीर चौधरी, अखिलेश वारीक, मिली शहा, पूजा हडकर, सानिका सावडेकर, चैताली चौधरी, दिशा चौधरी, ईशा भगत, टीना पंजवानी, सहाना मैत्रा, लतिका राजगणेश, रश्मिता चित्रे, हर्षिता पंजवानी, तनया अचरेकर, सागर चव्हाण यांचा समावेश होता. थायलंड येथे झालेल्या स्पर्धेत विजेत्या संघाला तेजस आणि महेश पुजारी या दोघांनीही विशेष मार्गदर्शन केले. पनवेल शाखेतर्फे पूनम सैंदाणे व कैलास सैंदाणे यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले. विजेत्या पेसमेकर संघाचे मान्यवरांनी कौतुक केले आहे.