खोपोलीत ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार
खोपोली : प्रतिनिधी
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीचे औचित्य साधत खोपोली भाजपतर्फे शनिवारी (दि. 25) शहरातील विविध क्षेत्रामधील दिग्गजांचा सत्कार करण्यात आला.
खोपोली शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. श्रद्धेय अटलजींच्या जीवनाचा कार्यकर्त्यांनी अभ्यास करून त्याप्रमाणे अनुकरण करण्याचे आवाहन भाजपचे खोपोली शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांनी या वेळी केले.
आपण इतर पक्षात काम केले, पण मानसिक समाधान फक्त भाजपमध्येच आहे. या पक्षात शेवटच्या कार्यकर्त्याला काम करण्याची संधी व न्याय मिळतो, असे खंडेलवाल यांनी सांगितले. ज्येष्ठ पत्रकार जयवंत माडपे यांनी अटल बिहारी यांच्या मुंबईतील प्रवासाचे काही किस्से सांगून एक समर्पित जीवनाला आपण मुकल्याची भावना व्यक्त केली. निशा दळवी यांनी अटलजींच्या जीवनावर केलेल्या कवितांचे वाचन केले.
या वेळी अध्यात्मिक, राजकीय, सामाजिक, उद्योग, पत्रकारिता इत्यादी क्षेत्रात योगदान दिलेल्या अॅड. मीनाताई बाम, रामभाऊ तावडे, मोरेश्वर दाते, सोहनराज राठोड, सुनील भालेराव, डी. जी. जाखोटिया, विश्वास टिळक, आप्पा टिळक, रवींद्र घोडके, जयवंत माडपे, सुरेश गोखले, नलिनी पाटील, उज्वला दिघे, अनिल रानडे, विठ्ठल शहासने, ध्रुव मेहेंदळे, रवी कुलकर्णी, सुरेन जाधव, परशुराम पांडे इत्यादी मान्यवरांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत नांदे यांनी केले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पुरी, शहर सरचिटणीस हेमंत नांदे, सहसचिव प्रमोद पिंगळे, गोपाळ बावस्कर, शहर महिला मोर्चा अध्यक्ष शोभा काटे, रसिका शेटे, ज्येष्ठ नेत्या स्नेहल सावंत, कामगार आघाडीचे सूर्यकांत देशमुख, ओबीसी सेलचे सचिन मोरे, युवामोर्चा शहराध्यक्ष अजय इंगुळकर, सोशल मीडियाचे राहुल जाधव, पुनीत तना, राकेश दबके, सुनिती महर्षी, विमल गुप्ते, व्यापारी सेलचे कीर्ती ओसवाल यांच्यासह अनेक कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रमोद पिंगळे यांनी आभार मानले.
कर्जतमध्ये ई-श्रम कार्डचे वाटप
कर्जत : बातमीदार
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमीत्त शनिवारी (दि. 25) कर्जत तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. नेरळ येथे भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन केले. तर किसान मोर्चाचे कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगट यांच्या कर्जत येथील कार्यालयात वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देशभर सुशासन दिवस साजरा केला जातो. कर्जत शहरातील सुनील गोगटे यांच्या कार्यालयात वाजपेयी त्यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच ई-श्रम कार्डचे वाटप करण्यात आले. त्या वेळी सुनील गोगटे, भाजपचे तालुका सरचिटणीस संजय कराळे, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष स्नेहा गोगटे, सोशल मीडिया जिल्हा सहसंयोजक सूर्यकांत गुप्ता, तालुका संयोजक मिलिंद खंडागळे, तालुका प्रज्ञा प्रकोष्ठचे समीर सोहोनी, युवा मोर्चा शहर अध्यक्ष मयूर शितोळे, उपाध्यक्ष समीर घरलुटे, सरचिटणीस मनोज रावळ, चिटणीस अभिनय खांगटे, सर्वेश गोगटे, विजय जिनगरे, पूनम डेरवणकर, स्वाती तामुंडकर, सुनीता देशमुख आदी उपस्थित होते.
नेरळ येथील कार्यक्रमात भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन केले. यावेळी कर्जत पंचायत समितीचे सदस्य नरेश मसने, नेरळ शहर भाजपचे माजी अध्यक्ष अनिल पटेल, अनिल जैन, युवा मोर्चाचे प्रज्ञेश खेडकर, ज्येष्ठ कार्यकर्ते संभाजी गरुड आदी उपस्थित होते.
रोह्यामध्ये काव्यवाचन
धाटाव : देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्ताने रोहा तालुक्यातील महादेववाडी येथील प्राथमिक शाळेत शुक्रवारी (दि. 24) रोजी भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून काव्य वाचन करण्यात आले. या वेळी भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांनी अटलजींच्या आठवणींना उजाळा दिला. युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष राजेश डाके, कामगार मोर्चाचे तालुका अध्यक्ष विलास डाके, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश सुतार, केंद्र प्रमुख गायकर, मुख्याध्यापक भोईर यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.