उरण : वार्ताहर
उरण चारफाट्याजवळ शिवसई या नावाने आपले सरकार सेवा केंद्राचे उद्घाटन उरणचे महसूल नायब तहसीलदार नरेश पेढवी यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 4) झाले. शिवसई आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक स्वाती मिथुन म्हात्रे यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. शिवसई आपले सरकार सेवा केंद्रामध्ये सर्व प्रकारचे दाखले मिळतील त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन पेढवी यांनी केले. या वेळी तहसील कार्यालयातील शिवनाथ गिरी, कुंजल पाटील, स्वाती मिथुन म्हात्रे, चाणजे ग्रामपंचायत सदस्या उज्ज्वला जगदीश म्हात्रे, जगदीश म्हात्रे, गणेश म्हात्रे, माजी सर्कल अधिकारी अनिल म्हात्रे, रूपेश पाटील, अॅड. प्राची पाटील, हरेश्वर ठाकूर, समीर थळी, मिथुन म्हात्रे, नितेश घरत, सुनील म्हात्रे, सचिन ठाकूर, अविनाश चोरघे, जिजा चोरघे, सचिन ठाकूर, दीपक हिंगमिरे, कमलाकर म्हात्रे, सुनील म्हात्रे आणि परिवार आदी उपस्थित होते. या केंद्रामध्ये उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर, डोमेसाईल दाखला, स्थानिक रहिवासी दाखला, जातीचा दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला, संमती पत्र, पॅन कार्ड, जात पडताळणी अर्ज, गुमास्ता, फूड परवाना, राजपत्र, ई-सातबारा उतारा, प्रॉपर्टी कार्ड, शेतकरी दाखला, संजय गांधी निराधार योजना, तसेच विविध प्रकारची सेवा दिली जाईल, असे शिवसई आपले सरकार सेवा केंद्राचे संचालक स्वाती मिथुन म्हात्रे यांनी सांगितले.
Check Also
कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा
विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …