Breaking News

लोणशीतील स्पर्धेत एमसीसी तळा संघ विजेता

माणगाव ः प्रतिनिधी

माणगाव तालुक्यातील एव्हरग्रीन  क्रिकेट क्लब लोणशी मोहल्ला आयोजित  मर्यादित षटकांच्या टेनिस ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेत एमसीसी क्रिकेट क्लब मेठ मोहल्ला तळा संघाने अंतिम सामन्यात साई क्रिकेट संघाचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत 24 संघांनी सहभाग घेतला होता. तृतीय क्रमांकाचे बक्षीस महेर एलेव्हन टेमपाले संघाने जिंकले. उत्कृष्ट फलंदाज म्हणून वलिद बंदरकर, उत्कृष्ट गोलंदाज दिपेश महाले, अंतिम सामन्यातील सामनावीर नईम रहाटविलकर, तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी दिला जाणार्‍या मालिकावीर किताबासाठी हिदायत चिपळूणकर याची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे हे सर्व तळा संघाचे खेळाडू आहेत. या सर्वांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभास लोणशी मोहल्ला मुस्लिम समाजाचे अध्यक्ष इस्माईल पालेकर, उपाध्यक्ष सिराज गैबी, तब्बसुम काझी, शादाब गैबी, मुस्तुफा वाडेकर, अ.मजीद वाडेकर, आसिफ गैबी, हुसैनमिया वसगरे, अ.रज्जाक ताज, अजगर करवेकर, मुन्ना एशविकर, रेहमान पाल, तौफिक काझी, जहीर वाडेकर, शफीक पटेल, अनिस काझी, हाफिज पाल आदींसह क्रिकेटप्रेमी व खेळाडू उपस्थित होते.

Check Also

कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा

कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …

Leave a Reply