पनवेल : वार्ताहर
श्री स्वामी समर्थ पालखी उत्साहामध्ये सहभागी होण्याच्या दृष्टीने व स्वामी सेवकांचा आनंद वाढविण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक विक्रांत पाटील कार्यकर्त्यांच्या साथीने हजारो स्वामी सेवकांना आईस्क्रिमचे वाटप करून वेगळ्या प्रकारची स्वामी सेवा करतात. त्यानुसार याहीवर्षी नगरसेवक विक्रांत पाटील यांनी त्यांच्या सामाजिक मंडळाच्या वतीने श्री स्वामी समर्थ पालखीचे व मठाधिपती सुधाकर भाऊ घरत यांचे स्वागत केले. व कार्यकर्त्यांच्या साथीने उपस्थित असलेल्या हजारो स्वामी सेवकांसाठी ते आईस्क्रिमचे वाटप करून एक वेगळी सेवा केली. स्वामी पालखी ही अंतिम चरणी आली असताना अशा प्रकारचे आईस्क्रिमचे वाटप म्हणजे स्वामी सेवकांसाठी एक वेगळाच आनंद असतो.