Breaking News

कर्जतमधील आश्रमशाळांत स्टुडंट पोलीस कॅडेट कार्यशाळा

कर्जत : बातमीदार

रायगड जिल्हा वाहतूक शाखेअंतर्गत असलेल्या स्टुडंन्ट पोलीस कॅडेट प्रोग्रॅम अंतर्गत कर्जत तालुक्यातील पिंगळस, पाथरज आणि चाफेवाडी येथील शासकीय माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक आश्रमशाळांच्या मैदानांवर विद्यार्थी, विद्यार्थीनींना स्वतःचे रक्षण कसे करावे, या बाबत जिल्हा समादेशक अ‍ॅड. के. डी. पाटील यांनी कवायतीचे प्रशिक्षण दिले. गुन्हेगारीपासून बचाव आणि नियंत्रण, मूल्य आणि नितीशास्त्र, कम्युनिटी पोलिसिंग, वाहतूक सुरक्षा, सामाजिक दुष्कर्माविरुद्ध लढा, महिला व मुलांची सुरक्षा, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा, आपत्ती व्यवस्थापन, वडिलधार्‍या माणसांचा आदर, संघात्मक कार्य (संघभावना), शिस्त या विषयांवर अ‍ॅड. पाटील सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच पोलीस अंमलदार प्रदीप झेमसे यांनी स्टुडंन्ट पोलीस कॅडेट प्रोग्रॅाम विषयी देण्यात आलेल्या पुस्तिकेचे व वाहतूक नियमन व अ‍ॅप विषयीच्या माहिती पत्रकाचे  वाटप केले. यावेळी या तिन्ही आश्रम शाळांचे मुख्याध्यापक संजय मागाटे, आर. एस. चव्हाण, महेश पाटील निबंध, चित्रकला, मैदानी स्पर्धा आयोजित करण्याबाबत मार्गदर्शन केले.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply