Breaking News

खारघरमध्ये आरोग्य शिबिराचे सभागृह परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
खारघरमधील वास्तुविहारमध्ये भाजपचे युवा नेते तथा साई गणेश मंदिर ट्रस्टचे संस्थापक समीर कदम आणि प्रभाग समिती ‘अ’च्या सभापती संजना कदम यांनी माघी गणेशोत्सव आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन शुक्रवारी (दि. 4) केले होते. या शिबिराचे उद्घाटन सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच या ठिकाणी गणेश जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाला भेट देऊन त्यांनी गणरायाचे दर्शन घेतले.
या वेळी प्रभाग सतिमी ‘अ’च्या सभापती संजना कदम, नरगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, रामजी बेरा, भाजप खारघर शहर अध्यक्ष बिज्रेश पटेल, सरचिटणीस दीपक शिंदे, किर्ती नवघरे, भाऊ पाटोले, योगेश जोशी, प्रणय मोरे, सुशांत पाटोले, प्रथमेश मोरे, श्री. चव्हाण यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रहिवासी उपस्थित होते.

Check Also

आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी …

Leave a Reply