Wednesday , February 8 2023
Breaking News

मुरूडमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण, भारतमातेचे पूजन

मुरुड : प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भाजपचे ज्येष्ठ नेते आण्णा कंधारे यांच्या मुरूडमधील निवास्थानी भारतमातेचे पूजन करण्यात आले. प्रथम पूजेचा मान शेगवाडा पाखाडी अध्यक्ष सुधीर पाटील यांना मिळाला. देशावर प्रेम करा व देशाच्या प्रति निष्ठा ठेवण्याचे आवाहन यावेळी आण्णा कंधारे

यांनी केले.

हिंदू एजुकेशन संचलित ओंकार बालवाडी व हायस्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना यावेळी आण्णा कंधारे यांच्या हस्ते खाऊचे वाटप करण्यात आले, तर सुधीर पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. भाजप तालुका अध्यक्ष महेंद्र चौलकर, शहर अध्यक्ष प्रवीण बैकर माजी तहसीलदार नयन कर्णिक, उमेश माळी, दिलीप अपराध, बाळा भगत, मेघराज जाधव, किशोर म्हसळकर, सुनील खेऊर, अरविंद गायकर, नैनिता कर्णिक, सीमा कंधारे, सुनील वीरकुड, सुशील ठाकूर, अ‍ॅड. कुणाल जैन यांच्यासह ओंकार बालवाडी व हायस्कूलचे विद्यार्थी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply