

नागोठणे : प्रतिनिधी
नागोठणे विभागीय भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विजयी संकल्प रॅलीला शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रॅलीत भाजपचे पदाधिकारी आनंद लाड, मनोज धात्रक, प्रकाश मोरे, अंकुश सुटे, मोरेश्वर म्हात्रे, ज्ञानेश्वर शिर्के, विठोबा माळी, हिरामण तांबोळी, अनिल पवार, शेखर गोळे, योगेश म्हात्रे, फातिमा सय्यद, रऊफ कडवेकर, विहार हेंडे, निलेश घाग, राकेश कामथे, विनोद पवार, निलेश देशमुख, प्रदीप पवार, जय म्हात्रे, सत्यम भोसले, महेंद्र चितळकर, जयेश म्हात्रे, प्रमोद ठाकूर, संकेत नाईक आदींसह कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.