माणगाव : प्रतिनिधी
रायगड जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य समिती सभापती तथा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी नगराध्यक्षपदासाठी माणगाव विकास आघाडीतर्फे नामनिर्देशन अर्ज दाखल केल्यावर शुक्रवारी (दि. 4) काँग्रेसमधून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत माणगाव येथे हा पक्षप्रवेश कार्यक्रम झाला.
या वेळी ज्ञानदेव पवार यांच्यासमवेत त्यांचे सहकारी माजी ग्रामपंचायत सदस्य काशिराम पोवार, कैलास पोवार, कार्यकर्ते संतोष मांजरे, बाळा पवार, कृष्णा दिवेकर, संजय मालोरे, वैभव पवार, प्रकाश जाधव, नागेश शिंदे, तुकाराम उतेकर, समीर पवार आदींनी शिवसेनेत प्रवेश केला. या कार्यक्रमास पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका व कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper