Breaking News

सिडकोकडून 68.4 हेक्टर कांदळवन क्षेत्राचे वन विभागाला हस्तांतरण

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा

सिडकोकडून  सोमवारी (दि. 21) दुसर्‍या टप्प्यात पनवेल तालुक्यातील, सिडको अधिकारक्षेत्रातील 68.4 हेक्टर कांदळवन क्षेत्राचे हस्तांतरण वन विभागाच्या कांदळवन कक्षाला करण्यात आले. सिडको उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्या हस्ते मुंबई कांदळवन संधारण घटक  विभागीय वन अधिकारी एम आदर्श रेड्डी यांना हे कांदळवन क्षेत्राचे हस्तांतरण करण्यात आले.

या आधीच्या पहिल्या टप्प्यात सिडकोने आपल्या अधिकारक्षेत्रातील 281.77 हेक्टर कांदळवन क्षेत्राचे वन विभागाला हस्तातंरण केले आहे. कांदळवनांचे पर्यावरणाच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेऊन, कांदळवनांचे राखीव वने म्हणून संरक्षण व्हावे, या उद्देशाने सिडकोकडून कांदळवनांचे हस्तातंरण करण्यात आले आहे.

सिडको पर्यावरणाचे जतन करण्यासाठी नेहमीच कटीबद्ध आहे. नवी मुंबईचे नियोजन करताना, सिडकोने उद्यान, क्रीडांगणे आणि एनडीझेडसह सुमारे 40 टक्के क्षेत्र हरितक्षेत्रासाठी ठेवले होते. आतापर्यंत सिडकोने ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील अंदाजे 2000 हेक्टर जमीन वनविभागाला सुपूर्द केली आहे. त्यामुळे कांदळवनांच्या जमिनींचे एवढे मोठे क्षेत्र हस्तांतरण करणारी सिडको ही एकमेव सार्वजनिक क्षेत्रातील एकमेव सरकारी संस्था आहे, असे डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.

या वेळी सिडको सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे, मुख्य नियोजनकार (बांधकाम परवाना) रविकुमार, अपर जिल्हाधिकारी तथा मुख्य भूमी व भूमापन अधिकारी (भूसंपादन) सतिशकुमार खडके आणि सिडकोतील अन्य अधिकारी त्याचप्रमाणे मुंबई कांदळवन कक्ष यांच्यातर्फे डी. एस. कुकडे, नवी मुंबई वनक्षेत्रपालदेखील उपस्थित होते.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply