Breaking News

बेलपाडा मार्केटमध्ये शौचालय बांधून द्या

भाजप नेते प्रभाकर घरत यांची मागणी

खारघर : रामप्रहर वृत्त

खारघरमधील सेक्टर 4च्या भूखंड क्र. 19ए मधील मार्केटमध्ये सार्वजनिक मुतारी तसेच शौचालय बांधून देण्यात यावे, अशी मागणी भाजप नेते प्रभाकर घरत यांनी सिडको व महापालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

खारघर सेक्टर 4च्या भूखंड क्र. 19ए मधील मार्केटमध्ये मुतारी तसेच शौचालयाची सुविधा नसल्यामुळे लोक उघड्यावर लघुशंका करतात. त्यामुळे तेथे घाण व मच्छर यांचा त्रास तेथील नागरिकांना होतो. तो होऊ नये यासाठी मुतारी व शौचालय लवकरात लवकर बांधून दिले, तर तेथील नागरिकांची गैरसोय होणार नाही व परिसर स्वच्छ राहील, असे प्रभाकर घरत यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Check Also

‘नैना’साठी शेतकर्‍यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका

आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्‍या मुंबईच्या अनुषंगाने नैना …

Leave a Reply