Breaking News

माथेरान दस्तुरी नाक्यावर टॅक्सी चालकांवर पोलिसांची कारवाई

कर्जत : बातमीदार

माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरी नाका येथील प्रवासी टॅक्सी चालकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विना परवाना गाडी चालविणे, कागदपत्रांची पूर्तता न करणे, कागदपत्र नसताना गाडी चालविणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेणे अशी प्रकरणे समोर आल्याने ही कारवाई केली आहे.

माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असून येथे येणार्‍या पर्यटकांना टॅक्सी चालक मालक संघटना सेवा देत असते. यातील काही टॅक्सी चालक विनापरवाना तसेच कागदपत्रे नसताना गाडी चालवतात, अशा तक्रारी येत असल्यामुळे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली दस्तुरी येथील टॅक्सी स्टँड परिसरात दोन दिवस तपासणी करण्यात आली. यावेळी विनापरवाना गाडी चालविणे, क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक आणणार्‍या एकूण 13 टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात आली. पोलीस हवालदार अरविंद ठाकूर, महेंद्र राठोड, पोलीस नाईक अशोक गर्जे, पोलीस शिपाई प्रशांत गायकवाड, दामोदर खतेले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅक्सी चालकांबाबत वारंवार तोंडी तक्रारी येत होत्या त्यामुळे तपासणी करण्यात आली. त्यात नियम मोडणार्‍या प्रवासी टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात आली. या गाड्या पर्यटक प्रवाशांची ने-आण करतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा महत्वाचा आहे.

-शेखर लव्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, माथेरान

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply