Breaking News

चौकमध्ये विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ

चौक : प्रतिनिधी

विद्या प्रसारिणी सभा या संस्थेच्या चौक येथील यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयात बिर्ला कार्बन इंडिया प्रा. लि. कंपनीच्या सौजन्याने बारावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन समारंभ संपन्न झाला.

संस्थेच्या कार्याध्यक्षा शोभाताई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बादशा भोमले केले. बिर्ला कार्बन इंडिया प्रा. लि. कंपनीचे मानव संसाधन विभाग प्रमुख प्रकाश देसाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना येणार्‍या परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जाण्याचे आवाहन केले तसेच परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी आम्ही दरवर्षी हेल्थ किट देत असल्याचे  सांगितले. शोभाताई देखमुख, संस्थेचे उपकार्याध्यक्ष  नरेंद्र शहा व पवनकुमार झा यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. शिक्षिका दिपाली बारणीस व शिक्षक अमोल वाघमारे यांनी मनोगत व्यक्त केले. काही विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेज जीवनातील आठवणींना उजाला देत शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

बिर्ला कार्बन कंपनीच्या वतीने या वेळी 124 विद्यार्थ्यांना हेल्थ किट (गुड नाईट कॉम्बो, कोलगेट, ब्रश, सॅनिटायझर, मास्क, डेटॉल साबण) एक्झाम पॅड, कंपास पेटी इत्यादी वस्तुंचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिलेश देशमुख यांनी केले बिर्ला कार्बन कंपनीचे सीएसआर प्रमुख लक्ष्मण मोरे, उपमुख्याध्यापिका कांता पुजारी, पर्यवेक्षक दिलीप मोळीक यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी या कार्यक्रमाला  उपस्थित होते. अनिल बडेकर यांनी आभार मानले.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply