पनवेल : रामप्रहर वृत्त
शिक्षण महर्षी कै.दादासाहेब लिमये यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (दि. 28) झालेल्या कोकण विभागीय कनिष्ठ महाविद्यालयन वक्तृत्व स्पर्धेत जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता बारावी कला शाखेतील ध्वनी सावंत व श्रवण कदम या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत श्रवण कदम याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. याबद्दल त्यास रोख पारितोषिक रुपये 1001 रुपये स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येऊन गौरविण्यात आले. ही स्पर्धा ग. बा. वडेर हायस्कूल व ओसवाल कनिष्ठ महाविद्यालय पाली, सुधागड. रायगड येथे झाली. या स्पर्धेत संपूर्ण कोकण विभागातून स्पर्धक आले होते. श्रवण कदम याने प्राप्त केलेल्या यशाबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, अध्यक्ष अरुणशेठ भगत, सचिव डॉ. एस. टी. गडदे, सहसचिव भाऊसाहेब थोरात, प्राचार्य प्रशांत मोरे, पर्यवेक्षक अजित सोनवणे, पर्यवेक्षिका स्वाती पाटील, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी त्याचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.