Breaking News

जेएनपीटी कॉरिडॉरसाठी करंजाडे आदिवासीवाडीतील घरे पाडली

पनवेल ः प्रतिनिधी

जेएनपीटी ते अहमदाबाद हा अवजड माल वाहतुकीसाठी उभारण्यात येणारा रेल्वेमार्ग पनवेल व उरण तालुक्यातून जात आहे. त्यासाठी अनेक वसाहती पाडण्यात येणार आहेत. सोमवारी करंजाडे येथील आदिवासीवाडीतील 12 घरे पाडण्यात आली. त्यामुळे रोज हातावर कमवून जगणार्‍या आदिवासीबांधवांपुढे निवार्‍याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बांधवांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली असता, त्यांनी तातडीने त्यांच्या तात्पुरत्या निवार्‍याची सोय केली.

रेल्वे प्रशासनातर्फे जेएनपीटी ते अहमदाबाद अवजड माल वाहतुकीसाठी दोन नवीन रेल्वेलाईन टाकण्यात येणार आहेत. त्यासाठी पनवेल तालुक्यातील आसूडगाव, मालधक्का व करंजाडे येथील बांधकामे पाडण्यात येणार आहेत. 13 ऑगस्ट 2010 नंतरची घरे पाडण्यात येणार असल्याच्या नोटिसा देऊन हरकती मागवण्यात आल्या होत्या. करंजाडे येथील आदिवासीवाडीवर असलेल्या 12 घरांपैकी रमेश वाघे, गणेश वाघे, राजेश नाईक, संदीप वाघे, रंजना वाघे, शिला वाघे, मिना वाघे व बळीराम वाघे या आठ जणांची  घरे सोमवारी (दि. 28 फेब्रुवारी) रोजी पाडण्यात आली.

या आदिवासी बांधवांजवळ राहायला जागा नसल्याने त्यांनी मंगळवारी आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी त्यांना तातडीने बांबू, ताडपत्री, चटई व खाद्यपदार्थ देऊन तात्पुरती निवार्‍याची सोय केली. त्याचप्रमाणे बुधवारी सिडको आणि रेल्वेच्या अधिकार्‍यांची भेट घेऊन या आदिवासीबांधवांच्या निवार्‍याची सोय करण्यासाठी पत्र देण्यात येणार असल्याचे आश्वासनही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिले.

रेल्वेने आमची घरे तोडल्याने आमच्याकडे दुसरी जागा नाही. आम्ही लहान मुले घेऊन कोठे जायचे? पूर्वी येथे 42 घरे होती. काही वर्षांपूर्वी 30 कुटुंबे जंगलात गेली, त्यापैकी 12 घरे राहिली होती. आम्हाला नोटीस दिली होती. पण आम्हाला वाचता येत नाही. गाववाल्यांकडे गेलो पण उपयोग झाला नाही. आम्ही मासे पकडण्याचे काम करतो. सकाळी जातो ते रात्री परत येतो. तीन महिने घरात अन्न शिजवले नाही. आज आमदारांनी मदत केल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो.

-शिवाजी कातकरी, करंजाडे

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply