Breaking News

पोलीस मिनीबस घुसली चहाच्या टपरीत

खांब-कोलाड मार्गावर अपघात; चौघे जखमी, टपरीधारकाचे मोठे नुकसान

धाटाव : प्रतिनिधी

खांब-कोलाड मार्गावरील पुगाव गावाच्या स्टॉपवर  असलेल्या चहाच्या टपरीत शुक्रवारी (दि. 25) सकाळी पोलीस मिनीबस घुसली. या घटनेत चार पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले असून मिनीबससह टपरीचे अतोनात नुकसान झाले.

पोलीस मिनीबस (एमएच-06,के-9930) शुक्रवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास खांबकडून कोलाडकडे जात होती. चालक संजय अण्णा चव्हाण यांचे नियंत्रण सुटल्याने मिनिबस पुगाव गावाच्या स्टॉपवर असलेल्या रुपेश अधिकारी यांच्या सद्गुरु चहाच्या टपरीत घुसली. या अपघातात चालक संजय चव्हाण यांच्यासह मिनीबसमधील चार पोलीस शिपाई किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर कोलाड आंबेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. तर पाच पोलीस कर्मचार्‍यांना मुकामार आहे. या घटनेची नोंद कोलाड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास निरीक्षक सुभाष जाधव  करीत आहेत.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply