चौक : रामप्रहर वृत्त
येथील सरनौबत नेताजी पालकर विद्या मंदिरमध्ये जागतिक मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. अविनाश देशमुख यांच्या हस्ते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यीक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांच्या प्रतिमेचे तर संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्र शहा यांच्या हस्ते सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सतीश बांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मच्छिंद्र बाविस्कर, जयराम म्हात्रे यांच्यासह प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या चिमुकल्या मुलींनी तसेच इयत्ता नववीच्या विद्यार्थिनींनी मराठी राजभाषा व राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या अनुषंगाने मनोगत व्यक्त केले. अॅड. अविनाश देशमुख, योगेंद्र शहा यांनीही मार्गदर्शन केले. अगस्ती फाउंडेशनच्या पल्लवी मॅडम, श्री. राघवेंद्र, शाळेचे मुख्याध्यापक बादशा भोमले, उपमुख्याध्यापिका कांता पुजारी, पर्यवेक्षक दिलीप मोळीक यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आबासाहेब तांबवे यांनी आभार मानले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयक तयार केलेल्या विविध प्रतिकृतींचे मान्यवरांनी निरीक्षण करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले.