Breaking News

रामशेठ ठाकूर विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या ओवेपेठ खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय व न्यू इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. 26) वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी शैक्षणिक स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यात यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका अंजली व हर्षदा यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे खारघर-तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल उपस्थित होते. त्याचबरोबर खारघर तळोजा विभागाचेे सरचिटणीस दिपक शिंदे, शाळा समिती सदस्य प्रभाकर जोशी, नगरसेविका नेत्रा पाटील, खारघर तळोजा विभागाचेे चिटणखस सचिन वास्कर, कामगार सेलचे अध्यक्ष जयदास तेलवणे, बाळाराम वास्कर आदींनी आपली उपस्थिती दर्शविली. हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडण्यासाठी विद्यालयाच्या प्राचार्या दूर्गा मॅडम आणि पर्यवेक्षिका वीणा मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचप्रमाणे कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाकरिता संस्थेचे चेअरमन रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरूणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, ज. भ. शि. प्र. संस्था पनवेलचे सचिव डॉ. गडदे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply