Breaking News

विविध मागण्यांसाठी भाजपचे नवी मुंबई आयुक्तांना निवेदन

नवी मुंबई ः प्रतिनिधी

नवी मुंबई मनपा सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी संबंधित संस्थांकडून वारंवार अनामत रक्कम घेत असते, ती वारंवार घेऊ नये. केवळ भाडे आकारावे यांसह बेरोजगार अभियंत्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी मनपा आयुक्त अभिजित बांगर यांना निवेदन दिले. यावर बांगर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. नवी मुंबईतील बेरोजगार अभियंत्यांना काम मिळावे, मनपा कर्मचारी बदली धोरणाची अंमलबजावणी व्हावी आदी मागण्यांसाठी भरत जाधव यांनी मनपाच्या आयुक्तांची भेट घेतली. यावेळी सुमारे 20 बेरोजगार अभियंते उपस्थित होते. या बेरोजगार अभियंत्यांना छोटी-मोठी कामे देऊन त्यांच्या हाताला रोजगार द्यावा, याबाबत निवेदन देण्यात आले.  बेरोजगार अभियंत्यांनी आपली नोंदणी शासन दरबारी करून त्या बेरोजगार अभियंत्यांना रोजगार देण्याबाबत आश्वासन दिले. त्याचप्रमाणे सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मैदानाच्या वापरासाठी संबंधित संस्थांकडून पालिका वारंवार अनामत रक्कम घेते. त्यांच्याकडून केवळ भाडे घ्यावे, अशी मागणीही करण्यात आली. याविषयी आयुक्तांनी लवकरच कारवाई करणार असल्याचे सांगितले.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply