कर्जत : बातमीदार
नेरळ पोलीस ठाण्याच्या कळंब आऊट पोस्ट पोलीस चौकीत मंगळवारी महाशिवरात्री निमित्त महापूजा आयोजित केली होती. दिवसभर भजन, हरिपाठ, कीर्तन माध्यमातून समाजप्रबोधन करण्यात आले.
कळंब येथील पोलीस चौकीत ग्रामीण भागात असून कळंब चौकी अंतर्गत सुमारे 60 गावे येतात. नेरळ पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी राजेंद्र तेंडुलकर, कर्जत पोलीस स्टेशनच्या निरीक्षक सुवर्णा पत्की, कळंब दुरक्षेत्रचे अंमलदार निरंजन दवणे, विद्या चव्हाण, भरत गर्जे, जिल्हा विशेष शाखेचे दिंडे, समीर भोईर, निलेश वाणी, मनीष खुणे यांच्यासह दुरक्षेत्र हद्दीत सर्व पोलीस पाटील या महापूजेला उपस्थित होते.
परिसरातील वारे, खैरपाडा, हरिपाठ मंडळ, कळंब भजनी मंडळ, खांडस, सुतारपाडा, चाफेवाडी, हरिपाठ मंडळ यांनी भजन आणि हरिपाठ सादर केले. रात्री हभप हरिचंद्र महाराज जाधव यांचे कीर्तन झाले.