Breaking News

बोर्ली स्थानकावर अपघाताला आमंत्रण

गतिरोधकावर पांढरे पट्टे मारण्याची मागणी

मुरूड ः प्रतिनिधी

मुरूड जंजिरा पर्यटनात साळाव-मुरूड रस्त्यावर सततच्या वाढत्या वाहनांच्या वर्दळीने बोर्ली स्थानकावर अपघाताची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन येथील गतिरोधकावर पांढरे पट्टे मारण्यात यावेत, अशी मागणी वाहनचालक व नागरिकांतून जोर धरत आहे.

मुरूड व काशिद ही दोन पर्यटनस्थळे असल्याने बोर्लीच्या मुख्य रस्त्यावर सदैव मोठी वाहतूक सुरू असते. पर्यटकांच्या गाड्या व प्रवासी वाहतुकीमुळे सतत वर्दळीच्या रस्त्यावर एखादी एसटी अथवा मालवाहू ट्रक माल उतरण्यासाठी रस्त्याच्या बाजूला उभा राहिल्याने दुसर्‍या बाजूने येणार्‍या वाहनाला अडथळा निर्माण होतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर येथील जनजीवन व पर्यटन व्यवसाय पूर्वपदावर येताना साळाव-मुरूड रस्त्यावर मुरूड जंजिरा पर्यटनात वाहनांची वाढती वर्दळ दिसत आहे.      

शनिवार-रविवार व सुटीच्या दिवशी वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात. वेळप्रसंगी वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागते. साळाव-मुरूड रस्त्यावर बोर्ली स्टँडनजीक एक रस्ता सुरई गावाकडे, तर दुसरा बोर्ली गावात जातो. या रस्त्यावरील वाढत्या वाहनांच्या वर्दळीने अपघाताची शक्यता लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याने येथे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गतिरोधकावर पांढरे पट्टे मारावेत, अशी मागणी वाहनचालक व स्थानिक नागरिकांतून होत आहे.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर

पनवेल ः रामप्रहर वृत्तदेशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त …

Leave a Reply