माणगाव ़: प्रतिनिधी
येथील संगमेश्वर मंदिरात मंगळवारी महाशिवरात्री भक्तिभावाने साजरी करण्यात आली. कोविड नियमांचे पालन करीत सुरक्षित अंतर ठेवून भाविकांनी मंदिरात दर्शन घेतले.
पहाटे अभिषेक झाल्यानंतर भक्तगण दिवसभर मंदिरात दर्शनासाठी भाविक येत होते. सायंकाळी महाआरती घेण्यात आली. मंदिर परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती.
मंदिराच्या गाभार्यात प्रसाद खरे, सचिन गोरेगावकर यांनी उत्तम अशी सजावट केली होती.