Breaking News

कलम 370 : तत्काळ सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर तत्काळ सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने गुरुवारी (दि. 8) नकार दिला. या याचिकेवर योग्य वेळी सुनावणी होईल, असे न्या. एन. व्ही. रमना यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने सांगितले.

वकील मनोहरलाल शर्मा यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर 12 किंवा 13 ऑगस्ट रोजी सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली होती. केंद्राने कलम 370 हटवण्याचा घेतलेला निर्णय अवैध आणि असंवैधानिक आहे, असे त्यांनी याचिकेत नमूद केले होते. याचिकेवर तत्काळ सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली होती.

जम्मू-काश्मीरच्या मुद्द्याशी संबंधित अन्य याचिका काँग्रेस नेते तहसीन पूनावाला यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे. जमावबंदी उठवण्यासह फोन, इंटरनेट, वृत्तवाहिन्या बंद करण्यासारखे घेतलेले निर्णय मागे घेण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे. राज्यातील वास्तवाची माहिती करून घेण्यासाठी एका आयोगाची स्थापना करावी, तसेच ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती या नेत्यांची सुटका करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply