उरण ः वार्ताहर
जेएनपीटी रस्त्यावर चिर्ले गावाजवळ उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याच्या ठिकाणी रस्त्याच्या खाली घसरला. सुदैवाने ट्रेलरचा चालक व क्लिनर या अपघातातून सुखरुप बचावला आहे.
सुमारे 20 टन सामान भरलेला कंटेनर (एमएच 46 बीबी 7397) हा जेएनपीटीच्या दिशेने जात होता. भरधाव वेगात जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर मुख्य रस्ता ओलांडून सर्व्हिस रस्त्यावर आला. तिथून रस्त्याच्या कडेने 50 फूट खाली घसरला. तिथे उड्डाणपुलाचे कामकाज सुरू होते. सुदैवाने कंटेनरचा चालक व क्लिनर या अपघातातून बचावले आहेत.
दरम्यान, जेएनपीटी मार्गावर अवजड वाहनचालक भरधाव वेगात जात असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेकदा दुचाकीचालकांसह पादचार्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. याबाबत वाहतूक पोलिसांनी ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरीत आहे.