बंगळुरू ः वृत्तसंस्था
कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याने आता वेगळेच वळण घेतले आहे. कर्नाटकमधील एच. डी. कुमारस्वामी सरकार पडल्यानंतर रविवारी (दि. 28) विधानसभा अध्यक्ष के. आर. रमेशकुमार यांनी जेडीएस आणि काँग्रेसच्या 14 बंडखोर आमदारांना अपात्र घोषित केले आहे. यापूर्वी विधानसभा अध्यक्षांनी तीन आमदारांना अपात्र घोषित केले होते. काँग्रेस-जेडीएसच्या एकूण 17 आमदारांनी बंडखोरी करत पक्षांकडे राजीनामे सादर केले होते. यानंतर अल्पमतात आलेल्या कुमारस्वामी सरकारला बहुमत गमवावे लागले होते. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांना सोमवारी (दि. 29) बहुमत सिद्ध करावे लागणार असून विधानसभा अध्यक्षांचा आजचा निर्णय अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. विधानसभा अध्यक्षांच्या आजच्या निर्णयानंतर विधानसभेत आमदारांची संख्या 207वर आली आहे. म्हणजेच बी. एस. येडियुरप्पा यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 104 आमदारांची आवश्यकता आहे. भाजपकडे स्वत:चे 105 आमदार आहेत.
2013पर्यंत निवडणूक लढवता येणार नाही
विधानसभा अध्यक्ष केआर रमेश कुमार यांनी रविवारी काँग्रेस-जेडीएसच्या आणखीन 11 बंडखोर आमदारांना अयोग्य घोषित केले. कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी अपात्र घोषित केलेल्या बंडखोर आमदारांमध्ये रोशन बेग, आनंद सिंह, एच. विश्वनाथ, एस. टी. सोमशेखर यांचा समावेश आहे. कर्नाटक विधानसभेचा कार्यकाल 2023पर्यंत आहे. विशेष म्हणजे, अपात्र घोषित करण्यात आलेले आमदार विधानसभेचे पोटनिवडणूकही लढू
शकणार नाहीत.
मी उद्या विधानसभेत 100 टक्के बहुमत सिद्ध करून दाखवणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसंच तत्कालीन आघाडी सरकारनं जे अर्थ विधेयक तयार केलं आहे. कोणताही बदल न करता ते विधेयक विधानसभेत मांडण्यात येईल. तत्कालीन जेडीएस-काँग्रेस आघाडी सरकारने तयार केलेले अर्थ विधेयक कोणताही बदल न करता विधानसभेत मांडणार.
– बी. एस. येडियुरप्पांनी, मुख्यमंत्री येडियुरप्पांनी