Breaking News

‘अमेया लॉजिस्टीक’ने जपली सामाजिक बांधिलकी

खोपटे येथे अन्नधान्यासह सॅनिटायझर, थर्मल स्कॅनिंग मशीन

पनवेल : वार्ताहर

उरण तालुक्यातील खोपटे गावात धसाखोशी पाड्याजवळ वसलेल्या अमेया लॉजिस्टीक पार्क नामक कंटेनर यार्डने सामाजिक बांधिलकी जपली असल्याचे समोर आले आहे. कंपनीने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर प्रकल्पाचे सीईओ पर्सी वापीवाला यांच्या मार्गदर्शनाखाली खोपटा गावातील गरजू नागरीकांसाठी तांदूळ वाटप केले आहे. त्याचबरोबर खोपटे गावातील घरोघरी वाटपासाठी सॅनिटायझर आणि गावच्या  बांधापाडा ग्रामपंचायतीकडे एक थर्मल स्कॅनिंग मशीनही सुपूर्द केली असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी राहील निगम यांनी बोलताना दिली आहे.

कंपनीच्या वतीने गावातील गरजूंकरिता सुरुवातीच्या काळात 800 किलो आणि त्यानंतर 1250 किलो, असा एकूण 2050 किलो चांगल्या प्रतीचा तांदूळ बांधपाडा ग्रामपंचायतीकडे सुपूर्द करण्यात आला आहे. खोपटे गावातील नागरिकांना कोरोना महामारीचा प्रादुर्भाव होऊ नये या करिता गावामध्ये अमेया लॉजिस्टीकच्या माध्यमातून जंतुनाशक फवारणी करण्यात आली. त्याचप्रमाणे गावातील नागरिकांसाठी बांधपाडा ग्रामपंचायतीकडे 1350 छोट्या आकाराच्या सॅनिटायझरच्या बॉटल्स ही मोफत देण्यात आल्याची माहिती राहील निगम यांनी बोलतांना दिली आहे.

खोपटे गावाकरिता बांधपाडा ग्रामपंचायतीकडे एक थर्मल स्कॅनिंग मशीन  देखील सुपूर्द करण्यात आली आहे. खोपटे गावाच्या करिता सातत्याने काही ना काही करण्याची तयारी दाखविणार्‍या अमेया लॉजिस्टीक पार्कने यापूर्वी खोपटे भागशाळेतील वीज वायरिंगसारखी कामे ही केली आहेत. कंपनीकडून गावकर्‍यांसाठी केल्या जात असलेल्या या सामाजिक उपक्रमाबद्दल गावातील नागरिकांनी कंपनी व्यवस्थापनाला धन्यवाद दिले.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply