Breaking News

कर्जतमधील फार्मसी महाविद्यालयात दीक्षांत समारंभ

कर्जत : प्रतिनिधी

कर्जतमधील कोंकण ज्ञानपीठ राहुल धारकर कॉलेज ऑफ फार्मसी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे दीक्षांत  समारंभ उत्साहात सम्पन्न झाला. या वेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महाविद्यालयातील सेमिनार हॉल मध्ये दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सरस्वती पूजन आणि जण गण मन या आपल्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.  प्रमुख पाहुणे  माजी सहाय्यक आयुक्त डॉ. बलभीम खोमणे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आला. याप्रसंगी फार्मा कंपनीजचे इंडस्ट्रियालिट्स, ट्रेनर, आणि कंसल्टंट  गोविंद बागनूर, संस्थेचे सदस्य झुलकरनैन डाभिया, महाविद्यालयीन विकास समिती सदस्य विजय मांडे  व प्राचार्य डॉ. मोहन काळे उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. काळे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविकात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ’जीवनाचा  इथून पुढील कार्यकाळ हा फार महत्वाचा आहे व त्यासाठी कसून मेहनतीची तयारी हवी असे सुचविले. कठीण परिश्रम व वेळेचे महत्व विद्यार्थ्यांना समजून घ्या असे सांगितले. यावेळी त्यांनी विविध नामवंत व्यक्तींची उदाहरणे दिली. कार्यक्रमाचे डॉ. खोमणे  यांनी ’फार्मासिस्ट ओथचा अर्थ, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ची हेअल्थ केयर व्याख्या, फार्मासिस्ट लोगो आणि ऍप्रॉन चे महत्व जाणून घ्या व स्वतःचे ब्रॅण्डिंग करा. असा सल्ला दिला. बागणूर यांनी ’जी.सी.पी चे महत्व व आपल्या प्रोफेशन चे महत्व जाणून त्याचा सन्मान करा.’ असे सूचित केले.  मांडे यांनी विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभावेळी  घातल्या जाणार्‍या पोशाखाचे महत्व समजावून सांगितले विद्यार्थ्यांना भविष्यात राष्ट्र आणि समाजाची सेवा करण्यासाठी त्यांच्या ज्ञान आणि कौशल्यांमध्ये उत्कृष्टता मिळवण्यासाठी प्रेरित केले.

विद्यार्थ्यांना या वेळी मान्यवरांच्या हस्ते सर्टिफिकेट देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थितांपैकी काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत मंचावर व्यक्त केले. जुन्या आठवणींना उजाळा देत आपल अनुभव सांगत कनिष्ठ विद्यार्थ्यांना संलग्नित राहण्याचे संबोधन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पूनम पाटील तर आभार प्रदर्शन प्रा. मनीषा चौधरी यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी, पालक, शिक्षक उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …

Leave a Reply