Breaking News

खोपोली अल्टा लॅबोरेटरीज कारखान्यात आग

दोन कामगार गंभीर जखमी

खोपोली, खालापूर ः प्रतिनिधी

मुंबई-पुणे जुन्या महाराष्ट्रीय महामार्गावरील औषधाची निर्मिती करणार्‍या अल्टा लेबोरेटरीज कारखान्यात एका प्लांटमध्ये रविवारी (दि. 6) सकाळी आग लागली. आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले, तरी दोन कामगार गंभीर जखमी आहेत. त्यातील एकाला मुंबई येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आगीचे कारण मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान अल्टा लेबोरेटरीज कारखान्यात धुराचे लोट दिसू लागल्यानंतर अपघातग्रस्त मदत टीमचे गुरू साठीलकर व सहकारी कार्यकर्त्यांनी कारखान्यात धाव घेतली. खोपोली अग्निशामक दलाचे प्रमुख हरिदास सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामकच्य जवानांनी आग विझण्यास सुरुवात केली होती. पण आगीची तीव्रता पाहता परिसरातील टाटा स्टील, उत्तम गलवा, मंगलम तसेच रसायनी येथील अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. अखेर दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवणत यश आले. यात दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. त्यातील एका कामगारास उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यास आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी, पोलीस उपअधीक्षक संजय शुक्ल, खोपोली पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

आग विझविण्याच्या घटनेत अपघातग्रस्त मदत टीमचे प्रमुख गुरू साठीलकर हनीफ कर्जीकर, अमोल कदम, दिनेश ओसवाल, अमोल टकेकर, शाहिद शेख यांचे अनेकांनी कौतुक केले आहे.

 या आधीही अपघातांची मालिका

अल्टा लॅबोरेटरी खोपोली औद्योगिक वसाहतीतीलमधील जुना कारखाना आहे. सन 2014 मध्ये शॉक लागून 2 कामगार ठार झाले होते. तर कारखान्यात झालेल्या स्फोटात 2 कामगारांना आपले प्राण गमवावे लागले होते.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply