Breaking News

मणिपूरचा खेळाडू भारतीय संघात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

मणिपूरमधील 18 वर्षीय खेळाडू रेक्स राजकुमार सिंह भारताच्या अंडर-19 संघात निवड झाली आहे. भारतीय संघात स्थान मिळवणारा रेक्स हा मणिपूरचा पहिला खेळाडू आहे. तो जलदगती गोलंदाजी करतो. रेक्स सिंहने डिसेंबर 2018मध्ये 11 धावांच्या मोबदल्यात 10 बळी घेत भारतीय क्रीडा विश्वाचे लक्ष वेधले होते. रेक्सने कामगिरीच्या बळावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) भारतीय संघात घेण्यास भाग पाडले. बीसीसीआयने नुकत्याच जाहीर केलेल्या 19 वर्षांखालील भारतीय संघात रेक्सची निवड केली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन चार दिवसीय सामन्यांसाठी तो भारतीय संघाकडून खेळणार आहे. डिसेंबर 2018मध्ये कूचबिहार ट्रॉफीत मणिपूर संघाकडून खेळताना रेक्सने प्रतिस्पर्धी अरुणाचल प्रदेशचा संपूर्ण संघ तंबूत पाठवला होता. त्याने 9.5 षटकांत 11 धावांच्या मोबदल्यात 10 बळी घेतले होते. 18 वर्षीय रेक्सला बीसीसीआयने या दमदार कामगिरीचे बक्षीस दिले आहे. भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याच्या मार्गदर्शनाखाली त्याला अंडर-19 संघात रेक्सला संधी मिळाली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply