Breaking News

‘कुटुंबीयांच्या प्रेमामुळे भारतात सुखरूप आलो’

रसायनी : प्रतिनिधी

युद्धभूमी युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. भारत सरकार या सर्व विद्यार्थ्यांना सुखरूपपणे मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. रायगड जिल्ह्यातील काही विद्यार्थी युक्रेनमध्ये अजूनही अडकले आहेत, तर काही सुखरुपपणे परतले आहेत. असाच युक्रेन ते भारत या प्रवासातील थरारक अनुभव पनवेल तालुक्यातील लाडीवलीत राहणारा साहील महामणकर याने सांगितला आहे. मी भारतात 24 फेब्रुवारीला येणार्‍या विमानाचे तिकीट काढले होते, परंतु कीव्हमध्ये परिस्थिती व वेळ खूपच खराब होती. आम्हाला किव्हच्या दूतावासाकडून सूचना देण्यात आली, पण उशिरा झाला होता, कारण तेथे जवळपास साडेतीनशे मुले एकत्र जमलो होतो तेथे खाण्याची आबाळ झाली होती. आम्हाला सर्वांना किव्ह येथे येण्यास सांगितले होते. टॅक्सीवाले पण घाबरत होते. कीव्हमध्ये युद्धची दाहकता वाढली होती. कीवमध्ये आमची बरीच गैरसोय झाली होती. कीव्हमध्ये आम्हाला तिरंगा झेंडा मिळाला नसल्याने आम्ही पेनाने झेंडा रंगवला व रेल्वे स्टेशन येथे आलो. तेथे प्रंचड गर्दी होती, कसेबसे चढलो. अवघड जागेवर बसून आम्ही आमच्या जबाबदारीने प्रवास केला. आम्हाला हंगेरी सरहद्दीवर चांगली वागणूक मिळाली. सतत चौदा तास बसमध्ये बसून राहिलो होतो. हंगेरीमध्ये भारतीय दूतावास होता तेथे थोडी सोयी उपलब्ध होती. माझे सहा मित्रांसोबत बुडापोस्टमध्ये सहा तास बसून राहिलो व मला शेवटी मुंबई येथे येणार्‍या विमानात सोय झाली. तिकीट खर्च भारत सरकारने केला. किव्हमध्ये खास सोय झाली नाही. मुंबईमध्ये आलेल्या प्रत्येकाची चांगली सोय व विचारणा केली गेली. आता भारत सरकारने आमचे पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी येथेच सोय करावी, अशी विनंती करतो आहे. माझी बहीण व कुटुंबातील प्रेम व भारत सरकारने केलेले प्रयत्न व आम्ही धीर सोडला नाही व सकारात्मक दृष्टिकोन सतत ठेवला व सर्वांचे प्रेम यामुळेच सुखरूप परत आलो, पण अजूनही मनाच्या थरकाप होतो आहे.

महाडमध्येही तीन विद्यार्थी परतले

महाड :  महाड मधील खुर्रम बिरादार, शोयब पठाण आणि मुघदा मोरे हे विद्यार्थी युक्रेन येथे अडकल्या होत्या. 11 दिवसांच्या संघर्षानंतर आज हे तीनही विद्यार्थी महाड येथील त्यांच्या कुटुंबात सुखरूप पोहचले. या विद्यार्थ्यांनी त्यांचे युध्दभुमीतील अनुभव व्यक्त करताना मायदेशी आणल्याबद्दल मोदी सरकारचे धन्यवाद मानले. युक्रेन या देशात एमबीबीएसच्या दुसर्‍या वर्षांत शिक्षण घेणारे महाड तालुक्यातील खुर्रम इजाज बिरादार वय 19, शोयब पठाण वय 21 आणि शेवटच्या वर्षाच शिक्षण घेणारी मुघदा पद्माकर मोरे हे तीनही विद्यार्थी आज महाडमधील त्यांच्या कुटुंबात सुखरूप पोहचले. या वेळी आपले अनुभव कथन करताना बिरादार व पठान हे दोघे युक्रेन मधील लव्हीव या शहरात होते. युध्द सुरू झाल्या नंतर या दोघांनी हॉस्टेलमधील रुम सोडून पोलंड गाठले मात्र या ठिकाणी व्यवस्था नझाल्याने ते पुन्हा युक्रेन मध्ये आले व तेथुन 20 किमीची पायपीट करून रोमानियात पोहचले. पुढे दुतावासाच्या माध्यमातून त्यांच्या भारता येण्याची व्यवस्था झाली आणि आज अखेर हे विद्यार्थी भारतीय वायुदलच्या विमानाने दिल्ली व तेथुन मुंबईत दाखल झाले, मात्र युक्रेनकडून कोणतेच सहकार्य झाले नसुन उलटी भारतीयांचा युक्रेनकडून ढालीसारखा उपयोग केला जात असल्याचा धक्कादायक खुलासा या विद्यार्थ्यांनी केला आहे. युक्रेनमधुन सुखरुप आपल्याला मायदेशी परत आणल्याबद्दल त्यांनी मोदी सरकारचे धन्यवाद माणले तसेच दिल्ली येथुन मुंबईत आणल्याबद्दल महाराष्ट्र सरकारलादेखील धन्यवाद दिले. आज त्यांच्या आई वडिलांच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंद दिसत होता.

युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनचे खुपच हाल होत आहेत. त्यांना खायला प्यायला अन्नपाणी मिळत नाही. हे अडकलेले सर्व विद्यार्थी जेव्हा मायदेशी त्यांच्या आई वडिलांकडे सुखरूप परत येतील तेव्हाच मला खर्‍या अर्थाने आनंद होईल.

-रेहमुनीसा बिरादार, खुर्रमची आई

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply