Breaking News

रोहा बाजारपेठेत नागरिकांची गर्दी, काही दुकानेही उघडी

रोहे ः प्रतिनिधी

कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र रोहा शहरात गुरूवारी (दि. 29) अत्यावश्यक सेवेच्या निमित्ताने नागरिकांची खरेदीसाठी गर्दी उसळली होती. महत्वाचे म्हणजे कडक निर्बंध लागू असतानाही अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त रोह्यातील अन्य काही दुकाने गुरूवारी दिवसभर उघडी ठेवून व्यापारी व्यवसाय करताना दिसले.देशात, राज्यात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. त्यामुळे राज्यात अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाऊन लावण्यात आला आहे. कोरोना संसर्गची साखळी मोडण्यासाठी शासन, प्रशासनाचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. लॉकडाऊनमध्ये सुरूवातीला काही दिवस व्यापारी व नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. मात्र आता कोरोनाविषयक नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होताना दिसत आहे. लॉकडाऊनच्या काळात जिवनावश्यक वस्तू, सामान खरेदीसाठी सकाळी 11 वाजपर्यंत बाजारपेठ खुली असल्याने नागरिक खरेदीसाठी गर्दी करतात. मात्र गुरुवारी रोहा बाजारपेठेतील जिवनावश्यक सेवेव्यतिरिक्त अन्यही काही दुकाने उघडल्याचे दिसून आले. भाजी मार्केट व मच्छी मार्केटशिवाय अन्य ठिकाणी रस्त्यावरही भाजी व मच्छी विक्रेते दिसत होते. छोटे विक्रेते रस्त्यावर होतेच परंतु मोठ्या व्यापार्‍यांनीही आपली दुकाने सुरू ठेवली होती. तर चप्पल, कापड यासह अन्य दुकाने आतून चालू होती. या दुकानांत खरेदीसाठी गर्दी दिसत होती.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply