आमदार प्रशांत ठाकूर यांचे पदाधिकार्यांना आवाहन
भटके-विमुक्त आघाडीच्या महिला पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र
पनवेल ः वार्ताहर
उत्तर रायगडमधील भटके-विमुक्त आघाडीच्या महिला पदाधिकार्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 6) नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी त्यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांना भारतीय जनता पक्षाचे कार्य प्रत्येक वंचित घटकांपपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले.
या वेळी भाजपा भटके-विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष बबन बारगजे, महिला आघाडी प्रदेश सरचिटणीस सुहासिनी केकाने, उत्तर रायगड भटके-विमुक्त आघाडीच्या महिला जिल्हा संयोजिका विद्या तामखडे, सहसंयोजिका नीता मंजुळे, सहसंयोजिका सुरवंता खताळ उत्तर रायगड जिल्हा प्रभारी चंद्रकांत मंजुळे तसेच पनवेल शहर मंडळाचे आघाडीचे अध्यक्ष गोपीनाथ मुंडे उपस्थित होते.
सचिन कवितके यांची जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली. तालुका स्तरावरील संयोजिका व सहसंयोजक यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. कामोठे मंडळ संयोजिका म्हणून वैशाली देवडे यांची निवड करण्यात आली. पनवेल मंडळ संयोजिकापदी अस्मिता गोसावी, पनवेल ग्रामीण संयोजकपदी प्रेमला नारनवर व खोपोली संयोजकापदी विभावरी पाठक यांची नियुक्ती करण्यात आली.
या सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांना आमदार प्रशांत ठाकूर व बबन बारगजे यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व भारतीय जनता पक्षाचे कार्य वंचित घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी काम करावे, अशा सूचना दिल्या. रायगड जिल्हा जिल्हा संयोजिका विद्या तामखडे यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाची मदत केली.