Breaking News

खोपोली भाजप महिला मोर्चातर्फे विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान

खोपोली : प्रतिनिधी

जागतिक महिला दिनानिमित्त खोपोली शहर भाजप महिला मोर्चा तर्फे सोमवारी (दि. 22) शहरातील कृष्णा व्हॅली सोसायटीच्या प्रांगणात सुनिता चव्हाण, रोहिणीताई टिळक, सुनिता पाटणकर या कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले. महिलांनी आता कुटुंब सांभाळून सर्व क्षेत्रात पुढे आले पाहिजे, असे प्रतिपादन अ‍ॅड. विद्याताई डोंगरे यांनी या वेळी केले.

भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अश्विनीताई पाटील, जिल्हा सरचिटणीस विनिता घुमरे, कोषाध्यक्षा रसिका शेटे, ज्येष्ठ सदस्या स्नेहल सावंत, सुहासिनी केकाणे, पनवेलच्या माजी उपमहापौर चारुशीला घरत, खोपोलीच्या माजी नगरसेविका अपर्णा मोरे, महिला मोर्चाच्या खोपोली शहर अध्यक्ष शोभाताई काटे, सरचिटणीस अश्विनी अत्रे, अपर्णा साठे, दमयंती कोळी, सीमा मोगरे, विमल गुप्ते, भाजपचे खोपोली शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, प्रमोद पिंगळे, गोपाळ बावस्कर, राहुल जाधव, सागर काटे यांच्यासह अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply