नगरसेवक विक्रांत पाटील यांची तत्परता
पनवेल : वार्ताहर
पनवेल शहरातील अमरधाम रोडवरील व अंकिता सोसायटी समोरील असलेल्या अशोक बागमधील राहणारे रहिवाशी ड्रेनेजच्या अनेक वर्षांपूर्वीच्या समस्येचे निराकरण झाले आहे. नगरसेवक विक्रांत पाटील यांच्या तत्परतेमुळे ही समस्या सोडविण्यात आली. परिसरातील नागरिक पाटील यांना धन्यवाद देत आहेत.
अमरधाम रोडवरील अशोकबागमध्ये छोटे ड्रेनेजचे चेंबर्स, आठ आठ दिवसांनी तुंबणारे पाणी, सांडपाण्याची येणारी दुर्गंधी यासर्व गोष्टींमुळे अशोक बागमधील रहिवाशी त्रस्त झाले होते. याबाबत अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही त्यांचा प्रश्न सुटत नव्हता. शेवटी याबाबतची तक्रार अशोक बागच्या रहिवाशांनी नगरसेवक तसेच माजी उपमहापौर विक्रांत पाटील यांच्याकडे त्यांच्या जनसेवा कार्यालयात येऊन केली. अशोक बागमधील रहिवाशांचा आरोग्यविषयक प्रश्न लक्षात घेता नगरसेवक विक्रांत पाटील यांनी सर्व त्वरित पाऊल उचलत कॉन्ट्रॅक्टरला बोलून घेतले व स्वखर्चाने ड्रेनेज बांधून दिले. आपल्या या प्रलंबित प्रश्नाचे निरसन करून दिलासा दिल्याबद्दल अशोक बागमधील रहिवाशांनी नगरसेवक विक्रांत पाटील यांना धन्यवाद दिले.