धैर्य सामाजिक संस्थेचा उपक्रम
पोलादपूर : प्रतिनिधी
धैर्य सामाजिक संस्थेच्या रानवडी (ता. पोलादपूर) येथील पुस्तकांची शाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त विद्यार्थी आणि ग्रामस्थांसाठी ऐतिहासिक पुस्तकांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
स्वराज्य संकल्पक श्री शहाजी राजे भोसले महाराजसाहेब ते पानिपतच्या युध्दापर्यंतचा मराठ्यांचा पराक्रम असा कालखंड म्हणजे स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर होऊन भारत देशात सर्वत्र मराठा साम्राज्याचा अंमल सुरू झाला. याच पराक्रमाची शौर्य गाथा सांगणार्या कादंबरी, संदर्भ ग्रंथ, दुर्ग, व्यवस्थापन, युध्दतंत्र, शस्त्र अभ्यास ग्रंथ अशा विविध पुस्तकांचे प्रदर्शन भरवून धैर्य सामाजिक संस्थेने वैचारिक शिवजयंती साजरी केली.
या उपक्रमासाठी धैर्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ओंकार उतेकर, मदतनीस सुजल दळवी, रानवडी शाळेचे मुख्याध्यापक सोपान चांदे, शिक्षिका वंदना सकटे, अरुणा कराडे आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित होते. सद्गुरु सेवा प्रतिष्ठान, पुणे या संस्थेने पुस्तकांच्या शाळेसाठी 100 पुस्तकांची भेट दिली. त्यात ऐतिहासिक, स्पर्धा परीक्षा पुस्तके, बालसाहित्य, कथा कादंबरी पुस्तके या पुस्तकांचा समावेश होता.