Breaking News

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सांगितीक होळी उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त

गेली दोन वर्षे कोरोनामुळे ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात करमणुकीचे कार्यक्रम न झाल्याने बुधवारी (दि. 23) झालेल्या सभेत सांगितीक होळी साजरी करण्यात आली. प्रथेप्रमाणे प्रथम सभासदांचे वाढदिवस साजरे करण्यांत आले.

ज्येष्ठ महिलांनी सादर केलेल्या इशस्तवनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. अनुप्रिता काळण यांनी सूत्रसंचालन केले. सुरुवातीस काही महिलांनी, किती सांगू मी सांगू कुणाला या गीतावर टिपर्‍यांचा नाच सादर केला. शामल आंग्रे व प्रीती वाणी यांनी कोळीगीते सादर केली. मृणालिनी मोघे व माधवी कोल्हापुरे यांनी हिंदी सिनेमागीते सादर केली. प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. त्यानंतर स्मिता धारप, दत्ता ढोले, विद्या नातू यांनी भावगीते सादर केली. पाहुणे कलाकार सुरेश कोळी यांनी ढोलकीवर उत्तम सोलो सादर करून सभागृहात टाळयांची बरसात केली. शुभांगी कर्‍हाडकर, शरद रानडे यांनीही गाणे सादर केले. माधुरी गुर्जर यांनी होळीच्या रंगांची बहारदार कविता सादर केली. शेवटी सामुहिकरित्या कोळीगीत सादर केले. या संपूर्ण कार्यक्रमात तबल्यावर मोहन शिरोडकर, हार्मोनियमवर वासुदेव नातू तर ढोलकीवर सुरेश कोळी यांनी उत्तम साथ दिली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सचिव जयवंत गुर्जर, स्मिता धारप, उज्वला कुलकर्णी, प्रज्ञा सामंत, शुभांगी हजारे यांचाही हातभार लागला आहे.

शेवटी अध्यक्ष नंदकुमार जोशी यांनी हा कार्यक्रम उत्तम प्रकारे सादर केल्याबददल कलाकार व उपस्थित सभासदांचे अभिनंदन केले.

Check Also

रायगड जिल्ह्यात एकूण 69.04 टक्के मतदान

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानात 69.04 टक्के …

Leave a Reply