Breaking News

भाजप नेते किरीट सोमय्या यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागतफ

ठाकरे सरकारमधील ’डर्टी डझन’ यांच्याविरूद्ध कारवाई करावीच लागेल- सोमय्या

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील दोपोली येथील अनधिकृत रिसॉर्टवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे शनिवारी (दि. 26) दापोली निघाले होते. त्यावेळी त्यांचे ठिकाठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. या वेळी किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्यासी ठाकरे सरकारवर निशाणा साधाला.

पोलादपूर, महाड, धाटाव : प्रतिनिधी

घोटाळे, मनीलाँड्रिंग केलेल्या ठाकरेंच्या सरकारमधील ’डर्टी डझन’ यांच्याविरूद्ध कारवाई करावीच लागेल, असा घणाघात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलादपूर शहरात केला. पोलादपूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून किरीट सोमय्या यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, बिपीन म्हामूणकर, संदीप ठोंबरे, राजन धुमाळ, पोलादपूर तालुका अध्यक्ष प्रसन्न पालांडे, नगरसेविका अंकिता जांभळेकर निकम, महेश निकम, समीर सुतार, एकनाथ कासुर्डे, शहर अध्यक्ष राजा दिक्षित, निलेश आंबेतकर, रश्मी दिक्षित, रचना धुमाळ, समाधान शेठ, निलेश चिकणे, पंकज बुटाला, भाई जगताप, मंगेश शिंदे, महिला मोर्चाच्या कालिका अधिकारी, योगिता भागवत, तनुजा भागवत, उज्ज्वला शेठ, विशाखा आंबेतकर यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

आम्ही हातोडा घेऊन मंत्री अनिल परब यांचा निषेध करणार आहोत. त्यांच्याविरूध्द कारवाई होणार, आता फक्त मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्याची संपत्ती उघडकीस आली आहे, सोमय्या यांनी सांगितले.  तत्पूर्वी किरीट सोमय्या यांच्या मोटारींचा ताफा पोलादपूर येथे थांबताच येथील महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ’लढते रहो लढते रहो! किरीट सोमय्या लढते रहो!’ अशा घोषणा दिल्या.

महाड येथील विसावा हॉटेल येथेही त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते, जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, तालुकाध्यक्ष जयवंत दळवी यांच्यासह  कार्यकर्ते व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. किल्ले रायगड परिसरातील जो जमीन संपादित करण्याचा घाट राज्य सरकारकडून घातला जात आहे, त्याबाबत चौकशी व्हावी व ही संपादन प्रक्रिया स्थगित करावी अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली. याबाबत भाजपचे तालुका सरचिटणीस महेश शिंदे, ओबीसी सेलचे अध्यक्ष अजित अवकीरकर, उपतालुकाध्य चंद्रजित पालांडे यांनी एक निवेदन त्यांना सादर केले.

मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाड नाक्यावरही शनिवारी सकाळी 11 वाजता असंख्य कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत करून ‘किरीट भाई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, अनिल परब यांचा रिसॉर्ट तोडलेच पाहिजे’, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. या वेळी दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित घाग,  रोहा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते संजय कोनकर, भाजपा  सरपंच रघुनाथ कोस्तेकर,  किसान युवा मोर्चाचे अध्यक्ष निमिश वाघमारे, भाजपा  विभाग अध्यक्ष कृष्णा बामणे, नरेश कोकरे, महिला जिल्हा अध्यक्ष हेमा मानकर, सरचिटणीस यांच्यासह श्रद्धा घाग यांसह भाजपाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सोमय्यांच्या दौर्‍याकडे शिवसेनेचे दुर्लक्ष

दापोलीकडे चाललेला किरीट सोमय्या यांचा दौरा महाड, पोलादपूरमध्ये येऊनही स्थानिक शिवसेना नेतृत्वाकडून या दौर्‍याचा कुठेही निषेध करण्यात आला नाही. त्यामुळे याबाबत राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. तर भविष्यातील होणार्‍या घडामोडींवर सेनेकडून ही सावध भूमिका आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply