उरण : वार्ताहर
अयोध्येत उभारण्यात येणार्या श्रीराम मंदिरासाठी राम मंदिर निधी अभियाना अंतर्गत उरणमध्ये मंगळवारी (दि. 26) सायंकाळी बाईक रॅली आणि रथ यात्रा काढण्यात आली.
प्रथम मोरा येथील राम मंदिरात भाजप उरण व्यापारी असोशिएशचे अध्यक्ष हितेश शाह, अभियान प्रमुख दर्शन पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले व बाईक रॅली, रथ यात्रेला सुरुवात झाली. एकूण 65 रामभक्त रॅलीमध्ये सहभागी झाले होते. प्रसाद मांडलेकर यांनी श्री राम मंदिरबद्दल माहिती दिली.
या बाईक रॅलीमध्ये दर्शन पाटील, चेतन पाटील, प्रसाद मांडेलकर, हस्तीमल मेहता, रोशन मेहता, अजित भिंडे, आकाश शाह, मुकेश पुरी, मनन पटेल, अभिषेक जैन, कृनाल समेळ, श्रीपाद कात्रणे, स्वप्नील रावटे, देवेंद्र घरत, दिपक दळी, पुरुषोत्तम सेवक, नयन डांगी आदी सहभागी झाले होते.