पनवेल : राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांचा अनधिकृत रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या शनिवारी दापोली दौर्यावर होते. त्यांचे पनवेलजवळील पळस्पे फाटा येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. या वेळी बोलताना सोमय्या यांनी आमची लढाई राजकीय भ्रष्टाचाराशी आहे. त्यामुळे भ्रष्टाचार केला असेल, तर हिशेब द्यावा लागेल, अशा शब्दांत राज्य सरकारवर निशाणा साधला.
माहितीचा अधिकार आणि विविध तक्रार, अर्जांचा प्रभावी वापर करून राजकीय विरोधकांना जेरीस आणण्याचे काम करणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी शनिवारी दापोलीत धडक दिली. या दौर्यादरम्यान त्यांचे पळस्पे फाटा येथे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक मोठा हातोडा देऊन स्वागत केले.
सोमय्यांचे स्वागत करतेवेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, युवा नेते योगेश लहाने, अप्पा भागित, ओबीसी सेल उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, दीपक बेहेरे, पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, शहर सरचिटणीस अमरिश मोकल, विनोद साबळे, कसळखंड ग्रामपंचायतीचे उपसरपंच महेंद्र गोजे, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेेश पटेल, जगदिश घरत, भटक्या विमुक्त जमाती महिला आघाडी जिल्हाध्यक्ष विद्या तामखेडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …