Breaking News

पेण संघ कमळ चषकाचा मानकरी

उरण : वार्ताहर
भारतीय जनता पक्ष नवीन शेवा आयोजित आणि ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल) पुरस्कृत लेदर क्रिकेट टी-20 स्पर्धेत पेणच्या मुंडे स्पोर्ट्स संघाने विजेतेपदाचा कमळ चषक पटकाविला. गव्हाणचा बाप्पा मोरया संघ उपविजेता ठरला.उरण तालुक्यातील नवीन शेवा येथे झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभाला भाजप ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष चंद्रकांत घरत, भाजप तालुका उपाध्यक्ष पंडित घरत, सरचिटणीस दीपक भोईर, नवीन शेवा अध्यक्ष मयूर म्हात्रे, युवा नेते गणेश घरत, परेश घरत, भगवान घरत, नितेश घरत, विवेक म्हात्रे, समीर पाटील, मनोज ठाकूर, हेमंत ठाकूर, अजय घरत, स्वप्नील घरत आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

सलग 10 दिवस खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील 16 संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पेण संघाने 20 षटकांत तीन बाद 203 धावा केल्या होत्या. गव्हाण संघाचा डाव 19.4 षटकांत 145 धावांमध्ये संपुष्टात आला.
स्पर्धेतील मालिकावीर म्हणून रोहन कोळी (गव्हाण, 105 धावा आणि सात विकेट) अंतिम लढतीतील सामनावीर व उत्कृष्ट फलंदाज आरमान शेख (पेण, 122 धावा), उत्कृष्ट गोलंदाज अजिंक्य रसाळ (पेण, 13 विकेट) यांची निवड करण्यात आली. विजेते संघ आणि उल्लेखनीय कामगिरी बजावणार्‍या संघांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शांतेश्वरी क्रिकेट संघाचे तसेच सल्लागार चंद्रकांत म्हात्रे, मनोजकुमार म्हात्रे, अध्यक्ष गणेश घरत, उपाध्यक्ष अजय घरत, कर्णधार निषिकेत भोईर, उपकर्णधार अभिषेक म्हात्रे यांचे सहकार्य लाभले.

Check Also

राज्यस्तरीय 11व्या अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन

विजेत्या एकांकिकेला एक लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक पनवेल ः रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ …

Leave a Reply