Breaking News

महिलांनी स्वयंसिद्ध होणे गरजेचे – डॉ. स्वप्ना पाटकर

खारघर ः रामप्रहर वृत्त

आजच्या गतिमान जगात वावरायचे असेल तर महिलांनी स्वयंसिद्ध होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन डॉ. स्वप्ना पाटकर यांनी नुकतेच खारघर येथे केले.  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून टाटा कॅन्सर हॉस्पिटल येथे टाटा हॉस्पिटल वर्कर्स युनियन आणि टाटा हॉस्पिटलच्या प्रशासनाच्या वतीने हॉस्पिटलमधील महिला कर्मचारी व रुग्णांचे नातेवाईक यांच्यासाठी डॉ. स्वप्ना पाटकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी बोलताना डॉ. स्वप्ना पाटकर यांनी महिलांनी स्वयंसिद्ध व्हावे ही काळाची गरज असल्याचे सांगत अनेक उदाहरणे दिली. महिला आजच्या काळात मोठ्या प्रमाणात नोकरी, रोजगार करून पैसे कमावतात, परंतु त्यांचे व्यस्थापनदेखील तेवढेच महत्त्वाचे असते व त्यासाठी घरातील पुरुषांवर अवलंबून न राहता स्वतः त्यांनीच त्याचे व्यवस्थापन करण्यात पुढाकार घ्यावा हे पटवून दिले.

 या कार्यक्रमास टाटा हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता, उपसंचालक डॉ. एच. के. व्ही. नारायणन, डॉ. नवीन खत्री, माजी संचालिका डॉ.शुभदा चिपळूणकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत भट, प्रशासकीय अधिकारी एम. वाय. शेख हे मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली.  सूत्रसंचालन नयना बारसकर व स्नेहल पांडव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्कर्स युनियनचे अध्यक्ष सुरेश डाकवे, उपाध्यक्ष जनार्दन राणे, किरण पाटील, सचिव दीपक चव्हाण, उमाकांत गव्हाणे, प्रसाद फासे, अरुण गोसावी यांसह उल्का गोसावी, तनुजा दुर्वे, प्रेरणा डांगे, मिनल पारकर, शैलेश पर्वते, आनंद सावंत, मनोहर पारकर, दिनेश सिंग, चंद्रकांत घरत, उमेश कदम, पराग मदनकर, प्रताप फडतरे यांनी मेहनत घेतली.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply