Breaking News

रिक्षाचालकांचे उपोषण स्थगित

कर्जत शहरातील सर्व रिक्षा स्टँड अखेर खुले

 

कर्जत : बातमीदार

पनवेल येथील परिवहन अधिकार्‍यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर कर्जतमधील तीन रिक्षाचालकांनी आपले बेमुदत उपोषण मंगळवारी (दि. 5) रात्री उशीरा स्थगित केले. कर्जत शहरातील रिक्षा स्टँडवर सदस्य नसलेल्या रिक्षाचालकांना व्यवसाय करण्यास स्थानिकांचा विरोध होता. त्यामुळे शहरातील सर्व रिक्षा स्टँड खुले करावेत या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा चालक मालक संघटनेचे सदस्य मंगेश भोईर, संदीप रुठे आणि अरुण रुठे यांनी 4 एप्रिलपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. त्यापैकी भोईर व रुठे यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दुसर्‍या दिवशी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. दरम्यान, पनवेल येथील आरटीओ अधिकारी श्यामराव कमोद यांनी मंगळवारी कर्जत तहसील कार्यालयात तहसीलदार विक्रम देशमुख, पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली.  कर्जत शहरातील सर्व रिक्षा स्टँड खुले करण्याचा तसेच दादागिरी करणार्‍या रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असे लेखी आश्वासन परिवहन अधिकारी कमोद यांनी दिल्यानंतर बेमुदत उपोषण रात्री स्थगित करण्यात आले. या वेळी भाजपचे जिल्ह सरचिटणीस दीपक बेहेरे, सुनील गोगटे, नायब तहसीलदार सुधाकर राठोड, अ‍ॅड, कैलाश मोरे, हरिचंद्र यादव, धर्मेंद्र मोरे, दशरथ मुने यांच्यासह छत्रपती शिवाजी महाराज रिक्षा चालक मालक संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply