Breaking News

मुंगूर पालनामुळे महड परिसरात दुर्गंधी

खालापूर नगरपंचायतीचे मत्स्य विभागाला पत्र

खोपोली : प्रतिनिधी

पाताळगंगा नदीपात्र दूषित आणि दुर्गंधीस कारणीभूत असलेल्या मुंगूर तलावावर कारवाई करण्यासाठी खालापूर नगरपंचायतदेखील अ‍ॅक्शन मोडमध्ये आली असून, नगरपंचायतीने मुंगूर पालन तलावावर कारवाई करण्यासाठी जिल्हा मत्स्य विकास अधिकार्‍यांना पत्र दिले आहे. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशानुसार मुंगूर प्रजनन, मत्स्यपालन, वाहतूक व विक्री करण्यावर बंदी असतानादेखील खालापूर नगरपंचायत हद्दीतील महड तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणी  बेकायदेशीर मुंगूर मत्यपालन सुरू आहे. पाताळगंगा नदीकिनारी हा तलाव असून तलावातील अतिशय दुर्गंधीयुक्त पाणी थेट नदीपात्रात सोडले जाते. याशिवाय मुंगूर माशांना खाद्य म्हणून कोंबड्यांची आतडी व कुजलेले मांस टाकले जाते. त्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरत आहे. याशिवाय मृत मुंगूर मासे तलावाकाठी जाळण्यात येत असल्याने हवेत प्रंचड दुर्गंधी कित्येक तास राहते. काही दिवसांपूर्वी  मृत मुंगूर मासे गोणीत भरून नदीपात्रात सोडण्यात आले होते. ही दुर्गंधीयुक्त गोणी नगरपंचायत हद्दीतील वणवे निंबोडे गावानजीक अडकून पडली होती. त्यामुळे प्रचंड दुर्गंधीमुळे गावकरी हैराण झाले होते. परिसरातील जलपेय योजनादेखील पाताळगंगा नदिवर असल्याने दुर्गंधी आणि दुषीत पाण्यामुळे रोगराईच्या भीतीने नागरिकांनी खालापूर तहसीलदार आणि नगरपंचायत यांना तक्रारीचा लेखी अर्ज देत मुंगूर तलावावर कारवाईची मागणी केली होती.त्याची दखल घेत खालापूर नगरपंचायतींने जिल्हा मत्स्य विकास अधिकारी यांना लेखी पत्र देत मुंगूर पालन तलावावर कारवाईची मागणी केली आहे.

मुंगूर पालन तलावाबाबत पूर्ण माहिती असून मत्स्यविभाग कारवाई करीत नाही. या तलावावर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर उपोषण करण्यात येईल

-शितल वाघरे, ग्रामस्थ, खालापूर

 

नगरपंचायत हद्दीतील नागरिकांच्या मुंगूर तलावाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पेयजल योजना पाताळगंगा नदीवर असल्याने आरोग्याचा धोका उद्भवू शकतो. या दृष्टीने कारवाईसाठी मत्स्य विभागाला पत्र दिले आहे.

-रश्मी चव्हाण, मुख्याधिकारी, नगरपंचायत-खालापूर

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply