Breaking News

जय भवानीऽऽ, जय शिवाजी!

गव्हाण-कोपरमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मंगळवारी (दि. 19) गव्हाण-कोपरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी कोपर फाटा येथील शिवरायांच्या पुतळ्याला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शिवजयंतीनिमित्त गव्हाण-कोपर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, गव्हाणच्या सरपंच हेमलता भगत, उपसरपंच सचिन घरत, ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, ज्येष्ठ नेते भाऊशेठ पाटील, वसंतशेठ पाटील, वहाळचे उपसरपंच अमर म्हात्रे, तालुका चिटणीस जयवंत देशमुख, विश्वनाथ कोळी, अनंत ठाकूर, किरण देशमुख, गजानन घरत, ग्रामपंचायत सदस्या सुनीता घरत, माई भोईर, कामिनी कोळी, योगिता भगत, शिल्पा कडू, उषा देशमुख आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त गव्हाण ते कोपर फाटादरम्यान भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. त्यात शिवप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिवरायांना अभिवादन केल्यावर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply