पनवेल : वार्ताहर
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात झालेल्या शहीद जवानांना तळोजा सीइटीपी व टीआयएकडून श्रद्धांजली वाहण्यात आली. यात वीरमरण आलेले महाराष्ट्रातील बुलडाण्याचे सुपुत्र नितीन शिवाजी राठोड आणि संजय सिंग दिक्षित यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक लाखाची मदत करण्यात येणार असल्याचे सीइटीपी व तळोजा इंडस्ट्रीयल असोसियशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी जाहीर केले.
या कार्यक्रमास ओमया कंपनीचे तुषार मेहता, तनीश रेसीडेन्सीचे बिनित सालियान, जनरल मॅनेजर देवानंद गाडगे, राजेंद्र पिसे, साईट ऑर्गनायझेशनचे एस. एस. शेट्टी, डॉ. दिसा लेब्रोटरीचे जे.टी.दिसा, इसका कंपनीचे एच.डी.कापरे आदी उपस्थित होेते.