Breaking News

कळंबोली वसाहतीतील रस्ता डांबरीकरणाला मुहूर्त सापडला

कळंबोली ः राम्रपहर वृत्त

कळंबोलीतील एलआयजी भागात पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळावे यासाठी कळंबोली सिडको प्रशासनाने गत वर्षीच्या मे महिन्यात मोठया जलवाहिनीचे काम केले, मात्र त्यासाठी खोदून ठेवलेला भला मोठा रस्ता पूर्ववत करण्यासाठी तब्बल एक वर्षाने सिडको प्रशासनाला मुहूर्त सापडला. हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

कळंबोली वसाहतीमधील सिडको सेंट जोसेफ विद्यालयाच्या बाजूला असणार्‍या पाण्याच्या टाकीपासून ते नजीकच्या एक.आयजी भागात जलवाहिनी टाकण्याचे काम गतवर्षीच्या मे महिन्यामध्ये सडको प्रशासनाकडून करण्यात आले. यासाठी येथील सर्वच रस्ता खोदून त्यातून जलवाहिनी टाकली. जलवाहिनीचे काम पूर्ण झाले तरीही गेल्या वर्षभरामध्ये खोदलेला रस्ता पूर्ववत डांबरीकरण आणि चकाचक करण्याचे मुहूर्त काही सिडकोला सापडेना. यामुळे नागरिकांची गैरसोय करून ठेवली. नागरिकांकडून या बाबत संताप व्यक्त केला जात होता.

या रस्त्यावर सेंट जोसेफ विद्यालयातील येणार्‍या विद्यार्थी पालक व नागरिकांची वर्दळ फार मोठ्या प्रमाणावर असते. खोदलेल्या रस्त्यांमधून दुचाकीस्वारांना मार्ग काढताना गाडी कोसळून अनेक जण जखमी झालेले आहेत, मात्र या गंभीर समस्येकडे सिडकोच्या अधिकार्‍यांना लक्ष देण्यास वेळ नव्हता.

अखेरी हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर या खोदलेल्या रस्त्याचे डांबरीकरण होत असल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. याबाबत सिडको प्रशासनाला धन्यवाद ही दिले जात आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply