पेण : प्रतिनिधी
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या बाह्यरस्ते विकास योजनेंतर्गत पेण नगर परिषद हद्दीतील रिंगरोड प्रकल्पाचे भूमिपूजन रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते गुरुवारी (दि. 12) करण्यात आले.
या कार्यक्रमास माजी मंत्री रविशेठ पाटील, सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नगराध्यक्ष प्रीतम पाटील, जि. प.चे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील, भाजप तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, शहर अध्यक्ष हिमांशु कोठारी, उपनगराध्यक्ष दीपक गुरव, गटनेते अनिरुद्ध पाटील, मुख्याधिकारी अर्चना दिवे, सभापती सुहास पाटील, अश्विनी शहा, शहनाझ मुजावर, नलिनी पवार, दर्शन बाफना, राजा म्हात्रे, नगरसेवक निवृत्ती पाटील, अजय क्षीरसागर आदींसह नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी पेण नगर परिषदेच्या विकासकामांसाठी निधी मिळावा याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार रिंगरूट प्रकल्पासाठी 53 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी पेण पालिकेस दिला आहे. या अंतर्गत आगरी समाज हॉल ते मोतीराम तलाव, मोतीराम तलाव ते सर्व्हे नं. 392 (कॅनल), सर्व्हे नं. 392 (कॅनल) ते बोरगाव रस्ता, बोरगाव रस्ता ते हिमास्पंन पाईप कंपनी, राष्ट्रीय महामार्ग 17 ते भुंडा पूल कडे, का. रा. पाटील गणपती कारखाना ते स्मशानभूमी, विश्वेश्वर मंदिर ते जॅकवेल, जॅकवेल ते आरटीओ कार्यालय, अंतोरा फाटा ते पंचायत समिती कार्यालय ते राष्ट्रीय महामार्ग या रस्त्यांचा समावेश आहे.