उरण ः बातमीदार
भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते तथा खोपटे गावचे सुपुत्र नवनाथ नारायण ठाकूर यांची खोपटे गाव अध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे पत्र उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी नवनाथ ठाकूर यांना दिले. लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर, आ. महेश बालदी यांनी नवनाथ ठाकूर यांना शुभेच्छा दिल्या.
या वेळी भाजपचे उरण तालुकाध्यक्ष रवीशेठ भोईर, उपाध्यक्ष मुकुंद गावंड, युवानेते महेश कडू, पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, नगरसेवक कौशिक शहा, सरपंच विशाखा ठाकूर, प्रदीप ठाकूर, बंटी म्हात्रे, प्रशांत ठाकूर, जितेंद्र ठाकूर, हेमंत म्हात्रे, प्रीतम ठाकूर, सुरज म्हात्रे, निलेश पाटील, अच्युत ठाकूर, सागर ठाकुर, उत्कर्ष ठाकुर, निलेश म्हात्रे, लखन ठाकूर, रुपेश म्हस्कर, साईल म्हात्रे आदी उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आपण भाजपची ध्येयधोरण व कार्यक्रम यशस्वीरित्या अंमलबजावणी कराल याची मला खात्री आहे, असे सांगत आमदार महेश बालदी यांनी नवनाथ ठाकूर यांचे अभिनंदन केले. तर उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मान्यतेने आपली खोपटे गाव अध्यक्षपदी नियुक्तीबद्दल आपले हार्दिक अभिनंदन असे सांगत तालुकाध्यक्ष रवीशेठ भोईर यांनी शुभेच्छा दिल्या.